
मनोज जरांगे पाटील हे प्रशासनाला वैद्यकीय देखरेख करू देत नाहीत, अशी तक्रार सरकारने केली होती. त्यानंतर तुम्ही स्वत: जरांगे किंवा त्यांच्या समर्थकांशी बोलून ते उपचार घेणार आहेत की नाही, हे आम्हाला पुढील १० मिनिटांत कळवा, अशा सूचना कोर्टाकडून जरांगेंच्या वकिलांना देण्यात आल्या.





