Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPetrol Diesel Price : मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या...

Petrol Diesel Price : मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

[ad_1]

Petrol Diesel Price on 19 Jan 2024 : गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतीय इंधनाच्या किमती वाढतात. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…. 

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर सकाळी 6 वाजता घोषित केले जातात. कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीमुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $72.85 वर व्यापार करत असताना, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $77.88 वर व्यापार करत होता. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने 2024 च्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलू शकतात, असे म्हटले होते. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात आज अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. 

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर 

मुंबईत आज पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये  पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर 

एसएमएसद्वारे दर जाणून घ्या

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP डीलर कोड 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP डीलर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.  



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments