Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश69th Filmfare Award | '...आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला'; राज्य सरकारवर...

69th Filmfare Award | ‘…आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला’; राज्य सरकारवर जयंत पाटील आक्रमक, ट्वीट व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

69th Filmfare Award  | ‘…आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला’; राज्य सरकारवर जयंत पाटील आक्रमक, ट्वीट व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘…आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला’; राज्य सरकारवर जयंत पाटील आक्रमक, ट्वीट व्हायरल

बॉलीवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार देखील गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल ट्वीट केले.

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातची वाट धरत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. याबाबत विरोधक देखील राज्य सरकारवर (State Govt) ताशेरे ओढत आहेत. अनेक उद्य़ोग तर शेजारच्या राज्यात जात असताना बॉलीवूडमधील (Bollywood) मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) देखील गुजरातमध्ये (Gujarat) होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल (69th Filmfare Award) ट्वीट केले.

जयंत पाटील यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन 69 वा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातला गेल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे की, “मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे.” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments