Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशGovernment Scheme | मोदी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठा दिलासा; महागाई रोखण्यासाठी उचलले...

Government Scheme | मोदी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठा दिलासा; महागाई रोखण्यासाठी उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल | Navarashtra (नवराष्ट्र)

Government Scheme | मोदी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठा दिलासा; महागाई रोखण्यासाठी उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मोदी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठा दिलासा; महागाई रोखण्यासाठी उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

सुमारे दोन आठवड्यानंतर देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशात महागाई वाढल्याने सरकारची चिंताही वाढली आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने योजना आखली आहे.

नवी दिल्ली : सुमारे दोन आठवड्यानंतर देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशात महागाई वाढल्याने सरकारची चिंताही वाढली आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने योजना आखली आहे. भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एसीआय (फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया) जानेवारीमध्ये तीन सरकारी संस्थांना 300,000 टन गहू वाटप करणार आहे. ज्यामुळे महागाई आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. हा गहू पिठात रूपांतरित करून ग्राहकांना सवलतीच्या दरात भारत बँड अंतर्गत विकला जाईल.

डिसेंबर महिन्यातील महागाईचे आकडे समोर आले आहेत. महागाई कमी करणे हे सरकार समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत ती कमी करण्यासाठी सरकारने फोलप्रूफ योजना आखली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सरासरी पीठाची किरकोळ किंमत 36.5 रुपये प्रति किलो झाली आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे डिसेंबरमध्ये भारतातील किरकोळ महागाई दर 5.69 टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments