Sunday, August 30, 2026
Homeफलटणसंविधान दिंडीच्या स्वागतासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण; १७ जुलै रोजी फलटणमध्ये स्वागत...

संविधान दिंडीच्या स्वागतासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण; १७ जुलै रोजी फलटणमध्ये स्वागत सोहळा

संविधान दिंडीच्या स्वागतासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण; १७ जुलै रोजी फलटणमध्ये स्वागत सोहळा

फलटण | प्रतिनिधी. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण यांच्या वतीने बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या **”संविधान दिंडी”**च्या स्वागत कार्यक्रमासाठी फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह विविध प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.

भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बार्टीच्या माध्यमातून राज्यभर संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. फलटणमध्ये या दिंडीचे जंगी स्वागत करण्यासाठी महोत्सव समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

या स्वागत सोहळ्यास नगराध्यक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे संविधान दिंडीचे स्वागत करण्यात येणार आहे. संविधानाच्या मूल्यांचा जागर करत सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments