Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशSharad Pawar | आता अध्यक्षानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? ;...

Sharad Pawar | आता अध्यक्षानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? ; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आता अध्यक्षानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? ; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोदी विरुद्धचा चेहरा कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व एनडीए आघाडीला (NDA Alliance) शह देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. इंडिया आघाडीची आज ऑनलाईन स्वरुपाची महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे. यामध्ये जागावाटपाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याबाबत सातत्याने इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना सवाल केला जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मौन सोडले आहे. शरद पवार यांनी मोदी विरुद्धचा चेहरा कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

शरद पवार हे आज जुन्नर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या आगामी रणनीती विषयी यावेळी त्यांनी माहिती दिली. इंडिया आघाडीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “मला आनंद एका गोष्टीचा आहे की, आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेशी सहमत नाहीत असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देत आहेत ही जमेची बाजू आहे” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments