Viral news: तब्बल १६००० फूट उंचीवर दरवाजा तुटला! विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १७७ प्रवाशांचा जीव टांगनीला, व्हिडिओ व्हायरल

0
19
Viral news: तब्बल १६००० फूट उंचीवर दरवाजा तुटला! विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १७७ प्रवाशांचा जीव टांगनीला, व्हिडिओ व्हायरल


alaska airlines boeing 737 door breaks : अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा दरवाजा अचानक तुटला. टेक ऑफ केल्यानंतर आकाशात सुमारे १६००० फूट उंच विमान गेल्यावर हा दरवाजा उडून गेला. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानात गोंधळ उडाला. विमान क्रॅश होईल या भीतीने नागरीक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. विमानातील सर्व १७७ जणांचा जीव धोक्यात आला होता. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाचे पोर्टलँड येथे एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अलास्का एअरलाइन्सचे फ्लाइट १२८२ पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.५२ वाजता निघाले होते, परंतु उड्डाणा नंतर काही क्षणात हा अपघात झाल्याने विमानाचे ५.३० वाजता पोर्टलँड विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.



Source link