
नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आणून हा ध्वज शिवरांयांच्या विचारांशी जोडता आला. आता शिवरायांनी कमावलेली नौदलाची ती शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गवर साजरा होतोय हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले.



