
Sangli News In Marathi: सांगलीच्या शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत शोष खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे, जेव्हा चिमुकली घराबाहेर खेळण्यासाठी गेली. मात्र, काहीवेळाने ती कुठेच न दिसल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरु केला, तेव्हा घराजवळच्या शोष खड्ड्यात चिमुकलीचा ड्रेस तरंगताना दिसला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.




