
ahmednagar Ghargaon murder: राज्यात किरकोळ कारणावरून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. छोट्या गोष्टीवरून एकमेकांचा जीव देखील घेतला जातो. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथे उघडकीस आली आहे. येथे एका युवकांची बिबट्याने हल्यात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यावर धक्कादायक गोष्ट पुढे आली. या तरुणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याने या तरुणाचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.








