
[ad_1]
दसऱ्याच्या मुहूर्तावर पंचकुलामध्ये देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी एकूण 3 महिने लागले. या पुतळ्याची उंची 171 फूट आहे. तसेच ते बनवण्यासाठी एकूण 18 लाख रुपये खर्च आला आहे.
दसरा म्हणजेच विजय दशमी (Vijayadashami) हा सण आज 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण आणि त्याचे दोन भाऊ मेघनाथ आणि कुंभकरण यांचे पुतळे ठिकठिकाणी बनवून त्यांचे दहन केले जाते. हे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविण्यासाठी केले जाते. भारतात अशी अनेक शहरे आहेत जिथे रावण दहन मोठ्या दिमाखात साजरे केले जाते आणि ते पाहण्यासाठी परदेशातून लोक मोठ्या संख्येने येतात.
रावणाचा देशातील सर्वात उंच पुतळा
आजतकच्या वृत्तानुसार, दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने काही स्पर्धांचेही आयोजन केले जाते, त्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे रावणाचा पुतळा बनवण्याची स्पर्धा. यावर्षी पंचकुलामध्ये देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याची एकूण उंची 171 फूट आहे. हा पुतळा देशभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील शालीमार मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. हा कार्यक्रम पंचकुलाच्या श्री माता मनसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट (दसरा कमिटी) आणि श्री आदर्श रामलीला ड्रॅमॅटिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे.
[ad_2]
Source link


