Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशWagh Bakri Tea | वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई निधन,...

Wagh Bakri Tea | वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई निधन, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाले होते जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Wagh Bakri Tea | वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई निधन, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाले होते जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घराजवळील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.

गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ४९ व्या वर्षी रविवारी संध्याकाळी अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड हा त्याच्या प्रतिष्ठित चहा ब्रँड – वाघ बकरी चहासाठी सर्वात लोकप्रिय आहे.

हे सुद्धा वाचा

देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घराजवळील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यादरम्यान ते जखमी झाले होते. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. देसाई यांच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आणइ त्यांना सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, देसाई यांची रविवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments