
रुळाखालील भराव वाहून गेल्याने हावडा-मुंबई या प्रमुख लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अमरावती-मुंबई, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल तसेच इतर गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे.





