महात्मा गांधी जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन
फलटण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने गजानन चौक येथे महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात नगरपरिषदेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक एकोपा या गांधीजींच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास गटनेते रोहित नागटिळे, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, नगरसेवक किरण राऊत, नगरसेवक अशोकराव जाधव, माजी नगरसेवक अजय माळवे, नगरपरिषदेचे अधिकारी विनोद जाधव, कर्मचारी सचिन घोलप आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या विचारांमधून समाजात स्वच्छता, शांतता, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश मिळतो. त्यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
