फलटण शहरातील पाणीपुरवठा सुमारे दोन तास उशिराने; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
फलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात आले आहे की, मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील नियमित पाणीपुरवठा सुमारे दोन तास उशिराने होणार आहे.
याबाबत फलटण नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली असून, पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या या आवाहनाची नागरिकांनी नोंद घेऊन पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
— मुख्याधिकारी, फलटण नगर परिषद, फलटण
