Monday, September 21, 2026
Homeफलटणहरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन ; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक...

हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन ; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

सामाजिक, पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाला मान्यवरांकडून उजाळा

फलटण | प्रतिनिधी : फलटणच्या सामाजिक, पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सामाजिक, वैचारिक आणि समाजहिताच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

हरिष काकडे ऊर्फ नाना यांनी समाजातील वंचित, उपेक्षित, दलित तसेच भटक्या-विमुक्त घटकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध सामाजिक, सहकारी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र, मिळालेल्या पदांचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजहितासाठी करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला, अशी आठवण त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

नाना यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक विकास काकडे, नगरसेविका मीनाताई काकडे, नगरसेविका सुपर्णाताई अहिवळे, नगरसेविका स्मिता शहा , पत्रकार अरविंद मेहता साहेब यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी हरिष काकडे ‘नाना’ यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांची असलेली संवेदनशील भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच सामाजिक परिवर्तनाच्या विचारांशी असलेली त्यांची बांधिलकी यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.

फलटणच्या सामाजिक चळवळीमध्ये नाना यांनी जपलेली विचारांची परंपरा आणि समाजहिताची भूमिका पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हरिष काकडे ऊर्फ ‘नाना’ यांच्या कार्याच्या स्मृतींना अभिवादन करताना उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments