
अकलूज प्रभाग क्रमांक २ मध्ये काँक्रिटीकरण रस्ता, ड्रेनेज व वॉटर सप्लायचे काम पूर्ण
नागरिकांच्या मागणीनुसार तातडीने विकासकामे पूर्ण; नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा विशेष पुढाकार
अकलूज : अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये काँक्रिटीकरण रस्ता, ड्रेनेज व वॉटर सप्लायचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रभागातील रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच ड्रेनेज व वॉटर सप्लायच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक कामे हाती घेण्यात आली. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्याची अवस्था सुधारली असून ड्रेनेज व वॉटर सप्लायचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सचिनजी देशमुख तसेच नगरसेविका सौ. प्रियांका लखन गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला.
नागरिकांच्या मागणीनुसार तातडीने कामे सुरू करून रस्त्याची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. विकासकामे पूर्ण झाल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील काळातही परिसरातील मूलभूत सुविधांकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
