Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमधील १० लाइटहाउस केंद्रांत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; ४०० युवकांची एकजुटीची रॅली

पिंपरी-चिंचवडमधील १० लाइटहाउस केंद्रांत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; ४०० युवकांची एकजुटीची रॅली

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त युवकांच्या उत्साहाने पिंपरी चिंचवड शहर एकजुटीने दुमदुमून गेले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि लाइटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन (LCF) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या १० लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, नेहरूनगर, भोसरी, किवळे, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि दापोडी या भागांमध्ये एकाच वेळी जनजागृती रॅली काढण्यात आल्या. जवळपास ४०० युवकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. चिंचवड केंद्रात सुमारे ६० युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ध्वजारोहणानंतर सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवकांनी एकाच पोशाखात खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. “ओळख स्वतःची, जिद्द यशाची” अशा उत्साहवर्धक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कौशल्यविकास, रोजगार, युवक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

रॅलीदरम्यान लाईटहाऊस चे कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी युवकांना उपलब्ध कौशल्यविकास व रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवकांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
लाईटहाऊस –PCMC कौशल्यम भागीदारीच्या माध्यमातून आतापर्यंत PCMC परिसरातील १३,००० हून अधिक युवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यापैकी ६,४०० हून अधिक युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा उत्सव, युवकांच्या सक्षमीकरणाचा संदेश
या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासोबतच युवकांनी स्वतःची क्षमता ओळखावी, आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी भविष्य घडवावे, हा संदेश देण्यात आला.

लाइटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन’बद्दल
लाइटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन ही संस्था भारतातील लाखो गरजू तरुणांना जीवनकौशल्ये, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी देऊन सक्षम समुदाय घडवण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या जीवनकौशल्य विकास दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) मॉडेलद्वारे २०१५ पासून ही संस्था काम करत आहे. याद्वारे स्थानिक आणि राज्य सरकारे पायाभूत सुविधा पुरवतात, तर खासगी क्षेत्र संचालन व अंमलबजावणीचा खर्च उचलते. आतापर्यंत भारतातील ६ राज्यांमधील २.८ लाखांहून अधिक तरुणांना लाइटहाउस कार्यक्रमांचा थेट फायदा झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments