Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती वकील संघटनेच्या २०२६-२७ कार्यकारिणीची निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

बारामती वकील संघटनेच्या २०२६-२७ कार्यकारिणीची निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

बारामती वकील संघटनेच्या २०२६-२७ कार्यकारिणीची  निवड; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

बारामती | प्रतिनिधी :- बारामती वकील संघटनेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कायदे व्यवसायातील अनुभवी व तरुण वकिलांच्या सहभागातून संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून वकील बांधवांच्या हितासाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यामध्ये अध्यक्षपदी ॲड. सचिन सुधाकर वाघ, उपाध्यक्षपदी ॲड. महेश प्रल्हाद आटोळेॲड. राजेंद्र आबासो मासाळ, सचिवपदी ॲड. स्नेहा माणिक मखरे, सहसचिवपदी ॲड. आकाश प्रभाकर घारे, खजिनदारपदी ॲड. हर्षद अशोक तिकोटे, ग्रंथपालपदी ॲड. कल्याण पोपट राजगुरू तसेच महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. भाग्यश्री शंकर जगधने यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने संघटनेच्या माध्यमातून वकील बांधवांच्या व्यावसायिक हिताचे संरक्षण, न्यायव्यवस्थेतील गुणवत्ता वृद्धिंगत करणे, विधीविषयक अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबिरे, ग्रंथालयाचा विकास, युवा वकिलांना मार्गदर्शन तसेच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी बारामती न्यायालय परिसरातील ज्येष्ठ विधिज्ञ, वकील बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली बारामती वकील संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बारामती वकील संघटनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी साहस Times तर्फे मनपूर्वक  शुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments