बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदी अॅड. हर्षद तिकोटे विजयी; विश्वासाला मिळाली यशाची पावती

0
2
बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदी अॅड. हर्षद तिकोटे विजयी; विश्वासाला मिळाली यशाची पावती

बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदी अॅड. हर्षद तिकोटे विजयी; विश्वासाला मिळाली यशाची पावती

बारामती | प्रतिनिधी : बारामती बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ च्या कार्यकारिणी निवडणुकीत खजिनदार पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ॲड. हर्षद तिकोटे यांनी दणदणीत विजय मिळवत खजिनदारपदावर आपली निवड निश्चित केली. त्यांच्या विजयामुळे बारामतीच्या विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वकील बांधव, हितचिंतक आणि समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कायदे क्षेत्रातील अभ्यासू वृत्ती, प्रामाणिक कार्यशैली, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि संघटनात्मक कामातील सातत्य यामुळे अॅड. हर्षद तिकोटे यांच्याविषयी सदस्यांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकत खजिनदारपदावर आपली छाप उमटवली.

विजयानंतर बोलताना ॲड. हर्षद तिकोटे म्हणाले, “हा विजय माझा नसून बारामती बार असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याचा आहे. सदस्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी प्रामाणिकपणे जपेन. आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता, शिस्त, उत्तरदायित्व आणि नियोजनबद्ध कामकाजाला प्राधान्य देत संघटनेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करेन.”

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पहार, गुलाल उधळत जल्लोष केला. यावेळी सहकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी अॅड. तिकोटे यांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ॲड. हर्षद तिकोटे यांनी बारामती बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे, ज्येष्ठ वकीलांचे, सहकारी मित्रांचे, समर्थकांचे तसेच प्रचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. “आपण दाखविलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद असून, खजिनदार म्हणून प्रत्येक सदस्याच्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा मी प्रयत्न करेन,” असेही त्यांनी नमूद केले.

बारामती बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवस्थापनाला अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला असून ॲड. हर्षद तिकोटे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

साहस Times तर्फे हार्दिक शुभेच्छा