Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक १० मधील लाभार्थ्यांना एसटी सवलत कार्डांचे वितरण संपन्न

प्रभाग क्रमांक १० मधील लाभार्थ्यांना एसटी सवलत कार्डांचे वितरण संपन्न

प्रभाग क्रमांक १० मधील लाभार्थ्यांना एसटी सवलत कार्डांचे वितरण संपन्न

अकलूज | प्रतिनिधी. :- अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मधील ज्या लाभार्थ्यांनी दि. ८ जून २०२६दि. १० जून २०२६ रोजी एसटी सवलत कार्डासाठी अर्ज केला होता, त्या लाभार्थ्यांना आज सकाळी १० वाजता कार्डांचे वितरण करण्यात आले.

नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माननीय उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नगरसेविका मनिषा मोहन तिकोटे तसेच नगरसेवक विलास क्षीरसागर (काका) यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एसटी सवलत कार्डांचे वितरण करण्यात आले.

यावेळी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापली एसटी सवलत कार्डे स्वीकारली. नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक, लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाभार्थ्यांनी कार्ड वितरणाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments