Friday, August 21, 2026
Homeसाताराप्राथमिक शिक्षक बँकेच्या ७९ व्या वार्षिक सभेत सभासदांना बोलू न दिल्याने संताप;...

प्राथमिक शिक्षक बँकेच्या ७९ व्या वार्षिक सभेत सभासदांना बोलू न दिल्याने संताप; कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्याध्यक्ष संजय खरात यांचा संचालक मंडळाच्या निषेध

प्राथमिक शिक्षक बँकेच्या ७९ व्या वार्षिक सभेत सभासदांना बोलू न दिल्याने संताप; कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्याध्यक्ष संजय खरात यांचा संचालक मंडळाच्या निषेध

सातारा | प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षक बँकेच्या ७९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांना आपली मते मांडण्याची संधी न दिल्याचा आरोप करत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्याध्यक्ष संजय खरात यांनी संचालक मंडळाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. मात्र, सभासदांना प्रश्न विचारण्याची व आपले मत व्यक्त करण्याची संधी नाकारण्यात आल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे त्यांनी सांगितले.

संजय खरात यांनी आरोप केला की, बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना केवळ नावालाच असून त्या प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

“ही शिक्षक बँक खरोखर सभासदांची आहे की केवळ संचालकांची?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी बँकेच्या कारभारात पारदर्शकता, सभासदांना अभिव्यक्तीचा अधिकार आणि त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणी केली.

यावेळी संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यात आला असून, भविष्यात सभासदांच्या हिताचे निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments