Sunday, August 23, 2026
Homeसाताराफलटणच्या काजल भोईटे यांना 'सर्वोत्कृष्ट मॉडेल' दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाचा...

फलटणच्या काजल भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाचा गौरव

फलटण | प्रतिनिधी :  फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांनी मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे फलटणच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

काजल भोईटे यांनी यापूर्वी ‘मिसेस वोग स्टार महाराष्ट्र’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला असून, ‘मिसेस युनिटी वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ‘मिसेस युनिटी वर्ल्ड अर्थ’ हा आंतरराष्ट्रीय किताबही आपल्या नावावर केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये शो-स्टॉपर म्हणून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि कौशल्याची प्रभावी छाप पाडली आहे.

मॉडेलिंग क्षेत्रातील सातत्यपूर्ण यश, व्यावसायिकता आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

फलटणचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नंदूशेठ भोईटे यांच्या स्नुषा तसेच उद्योजक ऋतुराज भोईटे यांच्या पत्नी असलेल्या काजल भोईटे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भोईटे परिवाराच्या प्रतिष्ठेला नवी उंची मिळवून दिली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल फलटणसह सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे फलटणच्या नावाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments