Friday, August 14, 2026
Homeफलटणफलटणमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचविण्याचे नगराध्यक्षांचे...

फलटणमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचविण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

फलटणमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचविण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील बाहुली शाळा परिसरातील फलटण नागरी आरोग्य केंद्रात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लसीचा डोस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

फलटण नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये दिवसभर लसीकरणासाठी पालकांची गर्दी पाहायला मिळाली. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा सेविका व कर्मचारी यांनी लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमास फलटण नगरपालिकेचे नियोजन व विकास समितीचे सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोहिनी हेंद्रे, नगरसेवक अमित भोईटे, ज्येष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे, नगरसेविका सिद्धाली शहा, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचवून पोलिओमुक्त समाज घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments