Friday, August 14, 2026
Homeफलटणपल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक विकास काकडे यांच्या हस्ते उत्साहात

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक विकास काकडे यांच्या हस्ते उत्साहात

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक विकास काकडे यांच्या हस्ते उत्साहात साजरा

फलटण | प्रतिनिधी  :-  फलटण येथील म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर) येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ फलटण नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक विकास वसंतराव काकडे (सर) यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी आयोजित लसीकरण शिबिरात उपस्थित लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी नगरसेवक विकास काकडे यांनी सांगितले की, “प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत.”

आरोग्य विभागाच्या वतीनेही नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिओसारख्या गंभीर आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्लस पोलिओ लसीकरण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आशा वर्केर्स  ज्योती पिसाळ.. तर सिस्टर ….समृद्धी दोरकर…व वर्षा आवळे. पाटील या  उपस्थित राहिल्या होत्या

“प्रत्येक थेंब अनमोल – पोलिओमुक्त भारताकडे एक पाऊल!” या संदेशासह शिबिरात बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments