Thursday, September 10, 2026
Homeफलटणपांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी...

पांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी सुवर्णसंधी

पांथस्थ आयोजित एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अभ्यास दौरा; सहभागींसाठी सुवर्णसंधी


फलटण : इतिहास, संस्कृती आणि बौद्ध स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी “पांथस्थ” संस्थेच्या वतीने एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा मुंबई येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे आयोजित करण्यात आला असून हा दौरा पूर्णपणे निशुल्क असणार आहे.
या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये जतन करण्यात आलेल्या बौद्ध स्थापत्याशी संबंधित शिल्पकला, प्राचीन शिलालेख आणि ऐतिहासिक अवशेषांची माहिती सहभागींपर्यंत पोहोचवणे हा आहे. इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तूंविषयी सविस्तर माहिती दिली जाणार असून बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा जवळून अनुभवण्याची संधी सहभागीांना मिळणार आहे.
संस्थेच्या वतीने इच्छुकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील लिंकद्वारे व्हॉट्सअ‍ॅप समूहात सहभागी होऊन आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणी लिंक :
https://chat.whatsapp.com/GjpeecZLrK03BuVob6TtbD?s=cl&p=a&mlu=0
इतिहास, पुरातत्त्व आणि बौद्ध स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा अभ्यास दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments