Friday, September 11, 2026
Homeफलटणकालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न
फलटण (प्रतिनिधी) : मौजे ढवळ, ता. फलटण येथील कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विधीनुसार श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी महासभेच्या स्मृतिदिन विधी पद्धतीनुसार स्मृतिदिन संस्कार विधी पार पाडला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस, बौद्धाचार्य तथा श्रामणेर आयु. बाबासाहेब जगताप सर म्हणाले, “तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवजातीला चार आर्यसत्यांचा मार्ग दिला. त्यातील पहिले आर्यसत्य म्हणजे जगात दुःख आहे, तर त्याचबरोबर दुःख निवारणाचाही मार्ग त्यांनी दाखविला आहे. कालकथित आनंदा गायकवाड आपल्यातून जाऊन २१ वर्षे झाली असली तरी त्यांनी कुटुंबासाठी केलेले त्याग, समर्पण आणि योगदान आजही स्मरणात आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गायकवाड परिवार दरवर्षी स्मृतिदिन साजरा करतो, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.”

ते पुढे म्हणाले, “दुःख आहे म्हणून निराश होण्याऐवजी तथागतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून जीवनात सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक आहे. या पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. त्यामुळे कालकथित आनंदा गायकवाड यांच्या स्मृती जपत कुटुंबियांनी धम्माच्या शिकवणीनुसार जीवन जगावे आणि दुःखातून मुक्त व्हावे. आजच्या स्मृतिदिन कार्यक्रमातून गायकवाड परिवाराने एकत्रित येऊन समानता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला आहे.”

यावेळी बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी मार्गदर्शन करताना तथागत बुद्धांच्या धम्मातील वैज्ञानिक, तर्कसंगत व मानवतावादी विचारांचा स्वीकार करून धम्ममय जीवन जगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास गायकवाड परिवारातील सर्व नातेवाईक, कुटुंबिय, बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवारातील भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बौद्धाचार्य बाबासाहेब जगताप, फलटण तालुक्याचे माजी संघटक आनंद जगताप, आयुनि पारिजातका बाबासाहेब जगताप यांच्यासह अनेक धम्मबंधू-भगिनी उपस्थित होत्या.
कालकथित आनंदा गायकवाड यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments