स्वत:चं अपयश लपवायला दुसऱ्यांवर खापर फोडणं हा बालिशपणा, शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना अप्रत्यक

0
2


Shashikant Shinde and Mahesh Shinde:  सातारा जिल्ह्यातील धरणांमधील वाढता गाळ, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली आहे. “नवीन धरणे बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या धरणांतील गाळ काढल्यास पाणी क्षमता वाढू शकते, मात्र सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. वर्षानुवर्षे साठलेल्या गाळामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली आहे. गाळ काढल्यास नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढू शकते, परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.पाणी बंधाऱ्यांची आणि कॅनॉलची अवस्था भयानक झाली असून पाणी गळती होत आहे. या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची आमची मागणी असताना सरकारकडे निधीची क्षमता नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा निधी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवल्यामुळेच ही टंचाई निर्माण झाली असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

जिहे-कटापूर पाणी योजनेवरून शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही पुसेगाव पट्ट्यातील गावे ओलिताखाली आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ ‘आम्हीच केले’ असा गवगवा सुरू केला आहे. मुळात लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्रे केवळ मत मिळवण्यासाठी वाढवली गेली. जेव्हा ही व्याप्ती वाढवली जात होती, तेव्हा सत्ताधारी झोपले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला….पाणी सोडण्यास शशिकांत शिंदे विरोध करत असल्याच्या आरोप आत्ताच्या विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. हा अत्यंत बालिशपणा आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या लोकप्रतिनिधीच्या नावावर खापर फोडणे ही पळवाट आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे तांत्रिक नियोजन सत्ताधाऱ्यांना जमलेले नाही. पुसेगावच्या लोकांना फसवायचे आणि दोन भागात संघर्षाची ठिणगी टाकायची, हे पाप सत्ताधाऱ्यांचेच आहे. अशी टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी केली.

Satara news: साताऱ्यात नवे धरण बांधण्यापेक्षा सध्याच्या धरणांतील गाळ काढावा: शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणी क्षमता आणि त्या धरणांमध्ये साठलेल्या गाळामुळे पाणी पातळी कमी होणे. याचा अभ्यास करून नियोजन होणे गरजेचे आहे.   नवीन धरण बांधण्यापेक्षा त्यातील गाळ काढला पाणी पातळी वाढू शकते. मात्र, अद्याप असा कोणताही निर्णय सत्ताधारी पक्षाकडून झालेला नाही. वर्षानुवर्षे असणारे पाणी बंधारे आणि कॅनॉल याची सध्या परिस्थिती भयानक आहे. यामध्ये पाणी लिकेज साठी निधीची तरतूद व्हावी साठी आमची मागणी आहे. मात्र, या सरकारकडे निधीची क्षमता नाही. मराठवाडा, विदर्भाकडे निधी वळवल्यामुळे हा निधी कमी पडला असावा असे माझे मत आहे.

जिहे कटापूर पाणी योजनेतून पुसेगाव पट्ट्यातील गावे  ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकांनी हा प्रयत्न आम्ही केला असा गवगवा केला. आता सांगितलं जातंय शशिकांत शिंदे पाणी सोडायला विरोध करत आहेत. खरं तर हा बालिशपणा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपले अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या नावावर टाकण्याचा हा बालिशपणा आहे.  एकतर तुमचा अभ्यास कमी. सत्ता आणि मत मिळवण्यासाठी जी व्याप्ती वाढवली त्याचा हा परिणाम. माणमध्येही याची व्याप्ती वाढली त्यावेळी आपण सत्तेमध्ये असून सुद्सुद्धा झोपला होता का? उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे योग्य नियोजन झाले नाहीतर पाण्यासाठी मोठी लढाई होऊ शकते. 

जीहे कटापूर योजनेचे पाणी रामोशी वाडी परिसरात येत असेल तर पुसेगावच्या लोकांना आंदोलन करायला सांगायचे. आणि परत या भागाला पाणी देताना पुसेगावच्या लोकांना फसवायचे. चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे. लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्र तुम्ही का वाढवली. मान मध्ये वाढवली त्यावेळी तुम्ही काय झोपला होता का?.. पाणी द्यायला आमचा विरोध नाही पण तुम्ही सत्ता म्हणून काय विरोध केला. याचे पापाचे धनी तुम्ही आहात. फक्त मत मिळवण्यासाठी पाणी देतो, असं आश्वासन दिले गेले. सत्ताधाऱ्यांखाली अधिकारी किती चुकीचे काम करतात हे उदाहरण आहे. 20 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केलेला साठा सुद्धा कमी केला जातो. आणि हे पाणी दुसरीकडे दिले जाते. हा सर्व मूर्खाच्या बाजारातला झालेला निर्णय आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.

आणखी वाचा

Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही…; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?

आणखी वाचा



Source link