प्रेम, पैसा आणि पद या गोष्टी आयुष्यात हळूहळू आल्या, तर त्यापचवणे कठीण जात नाही. पण तीन गोष्टी अचानक आल्यावर गोंधळउडतो. असे म्हटले जाते की, या तीन गोष्टी मिळाल्यावर माणसेबदलतात. परंतु आपण अधिक खोलवर विचार केला, तर सत्य काहीवेगळेच आहे. सत्य हे आहे की, या तीन गोष्टी मिळाल्यावर आपलादडलेला स्वभाव व मनाच्या कोपऱ्यातील व्यक्तिमत्वाचा जणूस्फोटच होतो. त्यावर संत तुलसीदास यांनी काकभुशुंडी यांच्यामुखातून वदवले आहे : ‘श्री मद बक्र न कीन्ह केहि प्रभुता बधिर नकाहि, मृगलोचनि के नैन सर को अस लाग न जाहि।’ गर्वाने कोणालावाकवले नाही? अधिकाराने कोणाला बहिरे केले नाही? आणिमृगनयनी स्त्रीचे बाण कोणाला भेदलेले नाहीत? म्हणजेच मनातीलकाम, क्रोध , लोभ बाहेर येतात व मग माणसाचे वागणेबदलल्यासारखे वाटते. म्हणूनच मूळ स्वभावावर काम करा. त्याचेदोष दूर करा. समृद्ध करा.
Source link




