बलराज संघई यांचा कॉलम: जागतिक कामगार दिन, श्रमिक बांधवांच्या कष्टांना सलाम

0
1
बलराज संघई यांचा कॉलम:  जागतिक कामगार दिन, श्रमिक बांधवांच्या कष्टांना सलाम




कामगार चळवळींच्या गौरवासाठी राखीव दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; या दिवशी भारतात आणि भारतबाह्य अनेक देशांमध्ये या निमित्ताने कामगार बंधू भगिनींचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. कामगार : व्याख्या चलन मुद्रा स्वरूप, वेतन, पगार, किंवा वस्तुरूपाने मोबदला मिळवून शारीरिक वा मानसिक श्रम करणाऱ्या व्यक्तीला कामगार (Worker/Labourer) असे म्हणतात. यामध्ये कारखान्यातील मजूर, कुशल-अकुशल श्रमिक आणि नोकरदार यांचा समावेश होतो.औद्योगिक कलह अधिनियम, १९४७ नुसार, व्यवस्थापकीय काम सोडून इतर सर्व प्रकारचे काम करणारे व्यक्ती कामगार या वर्गात मोडतात. कामगार आणि श्रमाचे महत्त्व : अर्थात कामगार हे स्वतः परिश्रम पुर्वक उपजीविका करतात. खरे तर कामगाराच्या श्रमावरच संपूर्ण जग चाललेलं आहे. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगार नसल्यास कुठलेही कार्य चालण्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. संपूर्ण भौतिक जग आणि त्यांच्या गरजा या कामगाराच्या परिश्रमातूनच संपूर्ण होतात. म्हणूनच कामगार हा वर्ग पण मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. श्रमाचे ५ महत्त्व आहेत : १ मे: कामगार दिनाची सुरुवात : या दिवसाची सुरुवात १९ व्या शतकात अमेरिकेतील एका कामगार चळवळीतून झाली. मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने कामगारांना ८ तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी करणारा एक ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून हा एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला व आजही १ मे रोजी ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. कामगारांचे हक्क , अधिकार : कामगार वर्गात जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये घटनेने काही अधिकार व हक्क दिलेले आहेत. काही हक्कांचे कामगार कायद्यात रूपांतर झालेले आहे. काही मूलभूत हक्क आहेत जे कामगारांच्या मानवीय गरजेनुसार निर्माण केलेले आहेत. काही ठिकाणी काम करत असताना कामगारांना हे मूलभूत हक्क सहज मिळून जातात तर काही ठिकाणी मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. ही शोकांतिका अनेक ठिकाणी घडत असताना दिसते. कामगार विषयी अनेक कायदे आहेत, या ठिकाणी काही महत्त्वाच्या कायद्यांचे अल्प विश्लेषण केले आहे. भारतातील कामगार हक्क कायदा कामगारांचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित कामाची परिस्थिती, रास्त वेतन व सामाजिक सुरक्षा (PF, ESI) प्रदान करण्यासाठी बनवले आहेत. हे कायदे किमान वेतन, कामाचे तास, बोनस, आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करतात. आता सरकारने अनेक कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवीन कामगार संहिता (Labour Codes) आणल्या आहेत, ज्यामध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यावर भर दिला आहे. कामगारांचे प्रमुख हक्क आणि संबंधित कायदे: १ : किमान वेतन: सर्वांना कायद्याने ठरवून दिलेले किमान वेतन मिळणे हा हक्क आहे. २: कामाचे तास व सुट्ट्या: कारखान्यांच्या कायद्यानुसार (Factories Act, 1948) कामाचे निश्चित तास आणि साप्ताहिक सुट्टी मिळणे आवश्यक आहे. ३: बोनस: ‘पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट, १९६५’ नुसार कामगारांना बोनस मिळण्याचा हक्क आहे. ४: भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ESI: सामाजिक सुरक्षेसाठी PF आणि आरोग्य विम्यासाठी ESI सवलती. ५: महिला कामगार: ‘मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट, १९६१’ नुसार गर्भवती महिलांना पगारी सुट्टी आणि इतर लाभ मिळतात ६: बालकामगार बंदी: १८ वर्षांखालील मुलांना धोकादायक कामात लावण्यास ‘बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६’ नुसार बंदी आहे. कामगार दिनाचा इतिहास १ मे ! हा दिवस कामगारांच्या सन्मानाचा, त्यांच्या अथक कष्टांचा आणि त्यागाचा दिवस आहे. १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांना दिवसाचे १२ ते १६ तास काम करावे लागत असे. या अन्यायाविरुद्ध कामगार एकत्र आले आणि त्यांनी “८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास मनोरंजन” या मागणीसाठी संप पुकारला. या संघर्षात अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. श्रमाचा सन्मान: पृथ्वीवरील सर्व वस्तूंना स्वरूप देणाऱ्या प्रत्येक हातांचा हा गौरव आहे. कारखान्यातील कामगार असो, शेतातील शेतकरी असो, रस्ते बांधणारा मजूर असो किंवा कार्यालयात काम करणारा कर्मचारी, सर्वांच्या कष्टानेच देश घडतो. आजची परिस्थिती:
आज कामगार दिन साजरा करताना, आपण कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सुरक्षित कामाचे वातावरण, सन्मानजनक वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळणे हा प्रत्येक कामगाराचा हक्क आहे. म्हणूनच आजच्या दिवशी श्रमिक बांधवांच्या कष्टाला सलाम.

(संपर्क- 9420015108)



Source link