
माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” स्पर्धा उत्साहात संपन्न
माळीनगर : माळीनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खास महिलांसाठी “स्टार मिनिस्टर” या खेळाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली.
कार्यक्रमाचे सादरकर्ते अभिनेते प्रकाश हातकर यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत विविध खेळ आणि मनोरंजनपर उपक्रम राबविण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. विजेत्यांसाठी एक सुंदर पेठणीसह एकूण ११ बक्षिसे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सर्व बक्षिसे तांबवे गावचे बाळासाहेब भोसले यांनी आपल्या पत्नी कालकथित. मंगलाताई बाळासाहेब भोसले यांच्या स्मरणार्थ दिली होती. त्यांच्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक व भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.







