Sunday, August 30, 2026
Homeसातारानातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम...

नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम संपन्न

नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम संपन्न

नातेपुते :-नातेपुते येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त प्रा. सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रा. सुकुमार कांबळे यांनी समाजजागृती, शिक्षणाचे महत्त्व व महापुरुषांच्या विचारांचे आचरण यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अमर (शेठ) सोरटे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी नातेपुते येथील अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments