Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख


पुणे : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात आले असून १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
अंतिम मतदार यादीतील तपशीलानुसार पुरुष मतदारांची संख्या १,९३,४९६, महिला मतदारांची संख्या १,९०,२७१, तर इतर मतदारांची संख्या २४ आहे. एकूण मतदारसंख्या ३,८३,७६७ इतकी नोंदविण्यात आली आहे.
यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३,६०,६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ही संख्या ३,८८,३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.
सदर अंतिम मतदार यादी नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची सुविधा आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती मिनल कळसकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments