Monday, August 31, 2026
Homeसाताराफलटणमध्ये व्यापाऱ्यांवर सलग मारहाणीच्या घटना; निषेधार्थ २५ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर निवेदन

फलटणमध्ये व्यापाऱ्यांवर सलग मारहाणीच्या घटना; निषेधार्थ २५ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर निवेदन

फलटण | प्रतिनिधी :-  फलटण शहरात अलीकडील काळात घडलेल्या दोन मारहाणीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण व्यापारी संघटना यांच्या वतीने बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता फलटण शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शंकर मार्केट परिसरात हीरणवाळे बंधूंवर मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर व्यापारी वर्गात अस्वस्थता पसरली असतानाच मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार पेठ येथील हिंदुस्तान हार्डवेअरचे व्यापारी श्री. पटेल बंधूंना विनाकारण दहशत निर्माण करून मारहाण करण्यात आल्याची दुसरी घटना घडली. सलग दोन दिवसांत घडलेल्या या प्रकारांमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनांचा निषेध नोंदवून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, संबंधितांवर कडक कारवाई व्हावी आणि शहरात सुरक्षित व निर्भय व्यावसायिक वातावरण निर्माण व्हावे, या मागण्यांसाठी व्यापारी संघटनेने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
सर्व व्यापारी बांधवांनी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता फलटण शहर पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करावे, अशी नम्र विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments