
फलटण : आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे समता नगर येथे पंचशील तरुण मंडळ यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, लहान बालक-बालिका तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत माता रमाई यांच्या सामाजिक, कौटुंबिक व प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी सूत्रपठण घेऊन माता रमाईच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे यांनी केले.








