फलटण :- विडणी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवार सौ. सुषमाताई अविनाश मोरे, विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) तसेच सांगवी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सारिका संजय सोडमिसे यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भव्य जाहीर सभा मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता विडणी येथील उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेबाबत माहिती देताना विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सांगितले की, या सभेसाठी विडणी व परिसरात जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या सभेला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सभेला विडणी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू–भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून, विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, तसेच आळंदी–पंढरपूर रस्ता, फलटण–बारामती रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा केला आहे. याशिवाय नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये येणाऱ्या मोठ्या कंपन्यांमुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक विकासकामांसाठी ओळख असलेल्या विडणी गावाने लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे. गावाचा सर्वांगीण विकास आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून, अशा विकासशील गावात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची उपस्थिती लाभणार असल्याने या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विडणी येथे होणारी ही सभा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विडणी येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची जाहीर सभा; प्रचाराला तोफ – मंगळवारी सायंकाळी 6 वाजता उत्तरेश्वर मंदिर चौकात आयोजन
RELATED ARTICLES
