
फलटण :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती, धक्कादायक निधन चटका लावणारे आहे. अत्यतं उमदे व्यक्तिमत्व असणाऱ्या अजितदादांच्या जीवनाचा शेवट नियतीने असा का केला असावा हा प्रश्न राहून राहून मनात येतो. अजित पवार यांची गेल्या ३५ वर्षांवरची कारकीर्द वादळी, झंझावाती होती. काका आणि गेल्या साठ वर्षांच्या राजकारणाचे साक्षिदार असणारे शरद पवार यांच्या तालमीत त्यांनी कारकीर्द सुरु केली. असे सांगितले जाते की, मोठ्या झाडाखाली लहान झाड फार काळ तग धरत नाही, वाढत नाही. खुरटे रहाते. अंतर समाजाचे हे म्हणणे अजित पवार यांनी खोटे ठरवले. खरे तर अजित पवार हे नेतृत्व गुण घेऊन ते जन्माला आले होते. तडफ होती. सर्वसामान्यांचे प्रश्न समजण्याची जाणीव होती. प्रशासनावर पकड होती. स्पस्टवक्तेपणा असला तरी आतल्या गाठीचे ते नव्हते. खुनशी, डूख ठेवणारे नव्हते. असेल ते तोंडावर, मोकळेपणाने आणि थेट होते. सहाजिकच अशी व्यक्ती परवडणारी नसते. मात्र तिने केल्या तिच्या जागेमुळे तिला बाजूला करणे ही सोपे नसते. अजित दादा यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य होते तेंव्हा काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर राष्ट्रवादीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते. शरद पवार यांच्यावर राजीव गांधींच्या निधना नंतर व्ही. पी. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी अजित पवार खरे तर खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र शरद पवार यांना आणि यांचा अत्यंत सुरक्षित मतदार संघ म्हणून अजित पवार यांनी राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी जागा रिकामी दादा पुन्हा दिल्लीकडे महाराष्ट्राचे राजकारण केले. विशेषतः शरद व्यक्ति मत्वात अग्रणी होते. काँग्रेस केली. मात्र त्या नंतर अजित वळले नाही. त्यांनी सांभाळण्याचे काम पवार यांचा विश्वासपात्र त्यांच्यावेळी अजितदादा पक्षातून शरद पवार बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांची भिस्त काँग्रेसमधून फुटून येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांवर होती. मात्र संगमा आणि तारिक अन्वर सोडता शरद पवार यांच्या त्या बंडाला खासदारांनी साथ दिली नाही. काही प्रमाणात राज्यात आमदार सहभागी झाले. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वयाच्या, काही कमी अधिक वयाच्या मंडळींची टीम तयार केली. शरद पवार हे सगळ्यांचे मार्गदर्शक होते मात्र पक्षाचे काम वाढवण्याचे, पक्ष सांभाळण्याचे काम अजित पवार यांनी केले. आज राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्याबरोबर गेले हे त्यांच्या योग्यवेळी योग्य निर्णयाचे, लवचिकतेचे द्योतक आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री ते झाले. पण मुख्यमंत्री होता आले नाही. होण्याची संधी असताना ती गमावल्याची थेट टीका, मत त्यांनी शरद पवार त्यांच्या विरोधात जाहीरपणे त्यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडले त्या वेळी त्यांनी पक्ष चालवण्याची पूर्ण तयारी आपल्या पद्धतीने केली होती. त्यावेळच्या प्रसंगातून त्यांची ती इच्छा स्पस्ट जाहीर होत होती. आणि अनेकदा पक्ष श्रेष्टींचे ऐकूनही नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही हे शल्य त्यांना होते. त्यांनी त्या पोटी भाजपच्या मैत्रीची वाट धरली. महायुतीत सामील झाले. शरद पवार यांनी वेळेत त्यांच्या हातात पक्ष सोपवला असता तर पक्ष फुटण्याची वेळ आली नसती. सुप्रिया सुळे दिल्ली आणि दादा राज्यात राहिले असते. पक्ष एकसंघ राहिला असता. पहाटेचा शपथ विधी ते कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळापाशी आत्मक्लेश हा त्यांचा पट होता. मांढरदेव दुर्घटनेत त्यांनी केलेले मदत कार्य ते काम होणार असेल तर हो आणि नसेल तर तोंडावर नाही हा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालला होता. सत्तेत होता. घरापासून सुरु झालेल्यास संघर्ष कदाचित सामोपचाराच्या वाटेवर होता तेवढ्यात हे घडले. आता राजकारणात कोणते वळण नव्याने लागेल हे नक्की सांगता येणार नाही. दादांच्या राष्ट्रवादी पुढे जे दोन, तीन पर्याय आहेत त्यातला निवडणे किंवा शरद पवार यांनी पुन्हा एकदा दोन पक्षांना एकत्र करणे आदी विषय असू शकतात. खरेतर दादाच्याही मनात नसतात, वेळेचे पक्के असलेले दादा यांनी यमदूताला वेळ दिली नसताना आपल्यातून अजितदादा निघून गेले. त्याच्या स्मृती राजकारणातून कधीच मिटल्या जाणार नाहीत. मात्र एक झंजावात अनपेक्षितपणे निमाला आहे वास्तव आहे. साहस टाईम्स न्यूज परिवाराकडून अजितदादांच्या पवित्र आत्म्यास विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
बारामतीचा हिरा….
बारामतीचा विश्वकर्मा
विद्येचे प्रतिष्ठान जपणारा
जन सामांन्यांशी जोडलेला
नेता हा माणुसकी जाणणारा…
दिलखुलास संवाद साधत
मनामध्ये शिरणारा
धडाडीने निर्णय घेऊन
जागेवर न्याय करणारा…
असा कसा गेला अकाली
का नाही वेळ ही चुकली?
बारामतीत घडला हा हिरा
बारामतीतच आयुष्य रेषा तुटली…
रुबाबदार रूप तुमचे
पुन्हा आता दिसणार नाही
वाह रे पठ्ठे ही साद
पुन्हा कधी घुमणार नाही…
दुःख दिलेत जन्माचे
पोरके केलेत दादा क्षणात
जरी गेलात नजरे आड
रहाल कायम मनामनात…
जमिनीशी नाळ जोडलेल्या या लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली…💐🙏🥹
G. वर्षा…
What’s app वरून समभार







