
फलटण (प्रतिनिधी) – श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
🔸 राज्यस्तरीय भजन महोत्सव स्पर्धा
शनिवार, दिनांक 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय भजन महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला भजनी मंडळ, बाल भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ यांचा समावेश असून, विजेत्या मंडळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाला वारकरी संघटनेचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
स्पर्धा दररोज सकाळी 7.30 ते सायं. 7.00 या वेळेत महाराजा मंगल कार्यालयात पार पडणार आहे.
🔹 14 ऑक्टोंबर – सामाजिक उपक्रमांचा दिवस
वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘जिजाई’ बंगला, लक्ष्मीनगर, फलटण येथे शुभेच्छा स्वीकारण्यात येणार आहेत. याच दिवशी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत:
✅ रक्तदान शिबिर – महाराजा मंगल कार्यालयात आयोजित, रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू
✅ वडजल ग्रामपंचायतीस Water ATM मशीनचे सुपूर्दगी
✅ वडजल येथे वृक्षारोपण कार्यक्रम, सायंकाळी 6.30 वाजता
✅ समूह सभासदांना लाभांश वितरण
✅ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व बक्षीस वाटप
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व फलटणकरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले व महाराजा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.








