Saturday, August 22, 2026
Homeसातारा"फिक्स नगराध्यक्ष!" - सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचे नाव चर्चेत

“फिक्स नगराध्यक्ष!” – सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; अनिकेतराजे नाईक निंबाळकरांचे नाव चर्चेत

फलटण :- फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण ‘खुले’ जाहीर होताच, शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः नाईक निंबाळकर घराण्यातील दोन प्रमुख गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आता अधिक ठोस वाटू लागली आहे.

राजे गटाकडून या पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर ‘फिक्स नगराध्यक्ष’ म्हणत त्यांचे फोटोसह पोस्ट्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

अनिकेतराजेंना यापूर्वी नगरसेवक म्हणून अनुभव असून, ते गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सलग तीन दशकांपासून फलटण नगरपालिकेवर असलेली सत्ता पुढेही कायम राहावी, यासाठी राजे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

निवडणुकीला अद्याप दोन महिने बाकी असले तरी जनतेत चर्चेला जोर आला आहे – “नगराध्यक्ष कोण?” आणि त्यात अनिकेतराजेंचे नाव आघाडीवर आहे, हे निश्चित!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments