सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ, पवारांनी टोचले राऊतांचे कान

0
17
सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ, पवारांनी टोचले राऊतांचे कान


Mahavikas Aghadi : सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मविआत गोंधळ निर्माण झाला आहे. शिष्टमंडळात केंद्रानं त्यांच्या नातेवाईकांचा समावेश केल्याची टीका राऊतांनी केली आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर त्यांचेच सहकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राऊतांचे कान टोचले आहेत. 

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानविरोधात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली. दरम्यान यावरून मविआत गोंधळ निर्माण झाला आहे. कारण शिष्टमंडळावरून मविआत दोन भूमिका पाहायला मिळतायत. केंद्र सरकारनं शिष्टमंडळात गोतावळ्यांना संधी दिल्याचं म्हणत राऊतांनी आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांचे कान टोचले आहेत.

तर तिकडे  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केंद्र सरकाच्यचा भूमिकेवरून निशाणा साधलाय. नियमानुसार भाजपनं काँग्रेस पक्षाकडे सदस्याची नावं मागितली, मात्र, ऐनवेळी दिलेली नावं गाळून दुसऱ्या नेत्याचं नाव घेतल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधून पक्षाला न विचारताच प्रियंका चतुर्वेदींची निवड केली. 

काँग्रेसनं आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती मात्र, शिष्टमंडळात शशी थरूर यांना घेण्यात आलं आहे. 
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडून नवा प्लॅन आखण्यात आलाय. देशातील सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणार आहेत.

शिष्टमंडळात कोणकोण?

शशी थरुर काँग्रेस खासदार, रविशंकर प्रसाद, भाजप खासदार, संजय कुमार झा, जेडीयू खासदार, बैजयंत पांडा, भाजप खासदार , कनिमोळी करुणानिधी, द्रमुक खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी (SP) खासदार आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या शिष्टमंडळानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, दुसरीकडे मविआमधील काही नेत्यांनी मात्र, शिष्टमंडळाचं स्वागत  केलंय त्यामुळे मविआत शिष्टमंडळावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. 





Source link