Sunday, September 13, 2026
Homeसातारा"964 कोटींचा जलप्रवाह : हिंदूरावजींच्या स्वप्नांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात पूर्ती"

“964 कोटींचा जलप्रवाह : हिंदूरावजींच्या स्वप्नांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात पूर्ती”

फलटण | प्रतिनिधी. दुष्काळी भागाला पाणी मिळावे, हे स्व. लोकनेते मा.खा. हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न होते. त्यांच्या या दूरदृष्टीचा आणि संघर्षाचा परिपाक आज त्यांच्या सुपुत्र माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरत आहे.

नीरा-देवधर लाभक्षेत्रातील पाण्याचा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या संघर्षाला काल मोठे यश मिळाले असून, मौजे काळज ते आंदरुड या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी प्रचंड 964 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम विशेषतः गेल्या २५-३० वर्षांपासून आंदोरी येथे जाणीवपूर्वक थांबवण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यातील आंदोरी, खंडाळा ते काळज पर्यंतचे काम पूर्णत्वास येत असून, आता दुसऱ्या टप्प्यात मौजे काळज ते आंदरुड पर्यंत लाभक्षेत्रात पाणी पोहोचवण्यासाठीचे काम प्रत्यक्षात सुरू होत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे फलटणसह संपूर्ण दुष्काळी पट्टा सिंचनाच्या दृष्टिकोनातून उजळून निघणार आहे.

ही स्वप्नपूर्ती केवळ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच नव्हे, तर संपूर्ण दुष्काळी जनतेच्या न्यायासाठीचा विजय आहे. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी पाहिलेल्या स्वप्नांना न्याय देणारे खरे नेतृत्व म्हणजेच श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, असे शेतकरी वर्गातून गौरवोद्गार व्यक्त होत आहेत.

या कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मोठा आशीर्वाद लाभला आहे. यासोबतच फलटण तालुक्याचे आमदार श्री सचिन कांबळे-पाटील यांनीही या योजनेच्या मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला.

या ऐतिहासिक टप्प्यावर फलटण तालुका भारतीय जनता पार्टी तसेच नीरा-देवधर संघर्ष समिती फलटण, माळशिरस, खंडाळा वतीने सर्व नेत्यांचे व सरकारचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments