Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेश7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून...

7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

[ad_1]

7th Pay Commission Update: महागाई भत्ता (DA) मूळ पगाराच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DoPPW) 30 मे रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 20 रुपयांवरून  25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. बीएसएनएल आणि एमटीएनएल या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कम्बाइंड सर्व्हिस फ्रेमवर्क अंतर्गत कमाल ग्रॅच्युइटीची मर्यादा 20 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. महागाई भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 50% पर्यंत पोहोचला असताना हा बदल 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. 

वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) 30 मे 2024 रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते. ज्यात 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. ज्यामुळे महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय.
वर्धित डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युइटी (DCRG) मर्यादा बीएसएनएल आणि एमटीएनएल कर्मचाऱ्यांना पेन्शन नियम, 2021 च्या नियम 37 नुसार लागू होते. मार्च महिन्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युटी संदर्भात झालेल्या निर्णयानुसार, ग्रॅच्युटीसाठी टॅक्स लिमिट वाढवून 25 लाख इतकी करण्यात आली होती. या रक्कमेपर्यंत ग्रॅच्युटी मिळत असल्यास कोणताच टॅक्स लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याआधी ही मर्यादा 20 लाख रुपये इतकी होती. सीबीडीटीने 8 मार्च 2019 च्या नोटिफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युटीची मर्यादा 10 लाखाहून वाढवून 20 लाख रुपये केली होती. 

1 जानेवारीपासून नवीन डीए 

केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी डीएमध्ये सुधारणा करते. जुलै 2024 मध्ये 3% वाढ झाल्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये 3% ची केली जाण्याची शक्यता आहे. 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल. असे असताना मार्च 2025 मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्चमध्ये होळीच्या आसपास याची घोषणा केली जाते. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) केवळ 3 टक्क्यांनी वाढ होईल. सध्याचे ट्रेंड पाहिले तर महागाई भत्ता (जानेवारी 2025 DA) 56 टक्क्यांवर पोहोचेल. आपण यामागची आकडेमोड समजून घएऊया. आता AICPI निर्देशांकाचे ऑक्टोबरपर्यंतचे आकडे आले आहेत. पमृण नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3 टक्के वाढ दिसून येते.

AICPI निर्देशांक देशातील महागाई आणि वस्तूंच्या किमतीतील बदलांचा मागोवा घेत असतो. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024  या सहामाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. AICPI निर्देशांकनुसार, जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकांवर होता. ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोअर 53.64 टक्क्यांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA 53.95% वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये 143.3 अंकांच्या तुलनेत, भत्ता स्कोअर 54.49% होता. त्याच वेळी, ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, निर्देशांक 144.5 अंकांवर पोहोचला आहे. महागाई भत्ता 55.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याचा महागाई भत्ता दर 53 टक्के आहे, जो जुलै 2024 पासून लागू आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments