Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेश69th National Film Awards | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रहमान झाल्या...

69th National Film Awards | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रहमान झाल्या भावूक, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)

69th National Film Awards | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रहमान झाल्या भावूक, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

vahida rehman

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (69th National Film Awards) घोषणा 24 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आज या पुरस्कारांचं वितरण दिल्लीत करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वहिदा रेहमान हा पुरस्कार स्वीकारताना भावूक झाल्याचं दिसत होतं. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “आदरणीय मंत्री अनुराग ठाकूर व साऱ्या ज्यूरी मेंबर्सचे मी मनापासून आभार मानू इच्छिते. माझ्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आज मी जिथे पोहोचले आहे याचं सर्व श्रेय माझ्या लाडक्या चित्रपटसृष्टीला जातं.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments