Sunday, September 13, 2026
Homeसातारा३३० कोटींची फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पांसाठी तरतूद ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

३३० कोटींची फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पांसाठी तरतूद ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण:देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 1941 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लोणंद, फलटण ते बारामती या ५४ किलोमीटरच्या रेल्वेसाठी 330 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रेल्वे मार्गाच्या समारंभास रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती राहणार आहे.

2023-24 च्या अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वेच्या कामांसाठी महाराष्ट्राला विक्रमी 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेने सांगितले. 15,554 कोटी रुपयांचे विक्रमी वाटप “2009-14 मध्ये महाराष्ट्राला .प्रतिवर्षी देण्यात आलेल्या 1171 कोटी रुपयांच्या सरासरी वाटपाच्या जवळपास 13 पट अधिक आहे”, असे सीआर रिलीझमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले आहे.आर्थिक वर्ष 24′-25 मध्ये मध्य रेल्वेचा एकूण योजना परिव्यय रु 10611.82 कोटी आहे,2023-24 च्या रु. 10,600 कोटीच्या योजना परिव्यय (निव्वळ) पेक्षा जास्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments