Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रसावधान…! तेलाच्या पिंपावर ‘फॉर्च्युन' ब्रँडचे स्टिकर लावून होतेय भेसळयुक्त खाद्यतेलाची सर्रास विक्री

सावधान…! तेलाच्या पिंपावर ‘फॉर्च्युन’ ब्रँडचे स्टिकर लावून होतेय भेसळयुक्त खाद्यतेलाची सर्रास विक्री

सावधान…! तेलाच्या पिंपावर ‘फॉर्च्युन’ ब्रँडचे स्टिकर लावून होतेय भेसळयुक्त खाद्यतेलाची सर्रास विक्री

[ad_1]

फॉर्च्युन कंपनीच्या निरीक्षकांनी यवतमाळच्या बाजारपेठेत गुप्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपशील गोळा केला होता. तसेच बाजारात फॉर्च्युन तेलाच्या नावाने भेसळयुक्त खाद्यतेलाची कुठे आणि किती विक्री केली जाते याचा तपशील गोळा करून यवतमाळ शहर पोलीसांपुढं ठेवला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवले. यात यवतमाळ शहरातील व्यापारी उमेश दिलीप इसराणी (वय-४४; राहणार- सिँधी कँप, आर्णी रोड, यवतमाळ), अंकित प्रवीण कुमार राडिया (वय -२९; राहणार- गिरीजा नगर, यवतमाळ), अमित शाम लखानी (वय-२६; राहणार- शिवाजी नगर, यवतमाळ) दिलीप पारसमल ताथेड (वय-६५; राहणार-अग्रवाल ले-आउट, यवतमाळ) या व्यापाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या सर्व दुकानदारांनी ठोक व्यापारी दिलीप तातेड यांच्याकडून भेसळयुक्त तेल खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी बनावट तेलाने भरलेले एकूण ६८ पिंप जप्त केले असून याची बाजारातील किंमत १ लाख ९३ हजार ५०० रुपये असल्याचे बोलले जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments