Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेश12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत... त्यानंतर पत्नीने केलं...

12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत… त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड

12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत… त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड

[ad_1]

Crime News : उत्तर प्रदेशमधील झाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात ओम प्रकाश रायकवारचा मृतदेह सापडल्यानंतर तपासात या घटनेचा भयानक खुलासा झाला आहे. ओमचा मृतदेह हा रक्ताने माखलेला असल्याने अवघ्या 24 तासात पोलिसांनी मृताची ओळख पटवून या घटनेचा पदाफार्श केला आहे. पोलीस तपासात ओमची हत्या त्याच्या बायकोने केली आहे. एवढंच नाही या हत्येमध्ये त्याची मेव्हणी आणि मेव्हणीच्या प्रियकर सहभागी होते. या तिघांनी पोलिसांनी अटक केली आहे.  

Add Zee News as a Preferred Source

 

हत्यामागील कारण काय?

ओम प्रकाश हा झाशीचा रहिवाशी होता. याने 12 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील निवारी येथे राहणाऱ्या जयकुंवर नावाच्या तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी दिल्लीत संसार थाटला होता. त्यानंतर 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला होता. झाशीमध्ये आपल्या घराजवळच असलेल्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये तो कामावर होता. यावेळी त्याची पत्नी जयकुंवर आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत तिथे राहत होती. 

 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या हत्येमागे कारण असं ठरलं की, जयकुंवरची बहीण हरदेवी ही देखील कधी-कधी आपल्या बहिणीच्या घरी येत होती. या काळात हरदेवी आणि ओम प्रकाश यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेम संबंधातून त्यांनी शारीरिक संबंधदेखील ठेवले. पण काही दिवसांनी या गोष्टीची कुणकुण जयकुंवर लागल्यानंतर तिने बहीण हरदेवीचा बॉयफ्रेंड अमर सिंग याला सांगितली. 

यानंतर ओमच्या पत्नीला कळल्यानंतर ओमने पत्नीला मारहाण केल्याचा तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर तिने या रागाच्या भरातून धक्कादायक पाऊल उचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या पत्नीने, तिची बहीण हरदेवी आणि तिचा प्रियकर अमर सिंग यांच्यासोबत मिळून ओम प्रकाशची हत्या करण्याचा कट रचला. कटाचा एक भाग म्हणून जयकुंवर हिने पतीला फसवून गावात बोलावलं आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. 

FAQ

1. झाशी हत्याकांड नेमके काय आहे?
झाशीमधील बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात 22 सप्टेंबर 2025 (रविवार) रोजी ओम प्रकाश रायकवार (वय 35) यांचा रक्तमाखलेला मृतदेह सापडला. तपासात उघड झाले की, त्याची पत्नी जयकुंवर, बहीण हरदेवी आणि हरदेवीचा प्रियकर अमर सिंग यांनी मिळून हत्या केली. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

2. हत्येची घटना कधी आणि कुठे घडली?
हत्येची घटना 21 सप्टेंबर 2025 रोजी झाशी जिल्ह्यातील बाबिना पोलीस स्टेशन परिसरात घडली. मृतदेह 22 सप्टेंबर रोजी जंगलात सापडला. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी मृताची ओळख पटवली आणि तपास पूर्ण केला.

3. ओम प्रकाश रायकवार यांची पार्श्वभूमी काय आहे?
ओम प्रकाश रायकवार हा झाशीचा रहिवासी होता. 12 वर्षांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील निवारी (मंदसौर) येथील जयकुंवरशी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दिल्लीत संसार थाटला, आणि 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला. तो झाशीतील पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये काम करत होता.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments