Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशहरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा...

हरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा पराभव: कॉंग्रेस प्रवक्त्याचा गंभीर आरोप

हरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा पराभव: कॉंग्रेस प्रवक्त्याचा गंभीर आरोप

[ad_1]

हरियाणात आज जाहीर झालेले विधानसभा निवडणुकीचे निकाल कॉंग्रेस पक्षासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक असून वास्तविकतेच्या विरुद्ध लागले असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. हरियाणा निवडणुकीचे निकाल स्वीकारणे मला अशक्य आहे… असंही जयराम रमेश म्हणाले. हरियाणात निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ज्या-ज्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज केलेल्या आढळून आल्या त्या मशीनमधून वेगळा निकाल तर ज्या मशीनची बॅटरी ६०-७० टक्केच्या आसपास चार्ज असलेली दिसून आली त्यात निकाल वेगळा दिसून आल्याचं निरीक्षण कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नोंदवलं. ९९ टक्के चार्ज असलेल्या मशीनमध्ये कॉंग्रेसला खूप कमी मिते मिळाली असल्याचं खेरा म्हणाले. यासंबंधीची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल करणार असल्याचं खेरा म्हणाले. हरियाणातील हिस्सार, महेंद्रगड आणि पाणिपत या तीन जिल्ह्यांमधून कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबतच्या या तक्रारी प्राप्त झाल्याचे खेरा यांनी सांगितले. कॉंग्रेस उमेदवारांनी त्या त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली असल्याचं खेरा म्हणाले. आगामी काळात या सर्व तक्रारी एकत्र करून निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments