Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनसोलापुरात दोन दिवसीय योग शिबिरात सहाशे व्यक्तींचा सहभाग

सोलापुरात दोन दिवसीय योग शिबिरात सहाशे व्यक्तींचा सहभाग

सोलापुरात दोन दिवसीय योग शिबिरात सहाशे व्यक्तींचा सहभाग

[ad_1]

सोलापूर : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित दोन दिवसीय योग शिबिरात शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहाशे व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या शिबिरात योगासनांचे प्रशिक्षणही देण्यात आले.

केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विजापूर रस्त्यावर नेहरू नगराजवळील शासकीय मैदानावर सकाळी सहा ते आठ या वेळेत आयोजिलेल्या या योग शिबिराचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव, न्यू जॉगर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष आरवत्तू, उद्योजक वीरेश नसले, योग सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे आदी उपस्थित होते.केंद्रीय संचार ब्युरोच्या समाज माध्यमातून उपलब्ध केलेल्या योग आसनांच्या माहितीच्या आधारे योग सराव करण्यात आला.

सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी प्रास्ताविक केले. योग सेवा मंडळाचे योग गुरू मनमोहन भुतडा यांनी विविध योगासनांची माहिती दिली. लता माळगे, वासंती निंबाळकर व कालिदास कोंडा यांनी शिथिलीकरणाचे व्यायाम, उभी आणि बैठी योगासने, पोटावरील आणि पाठीवरील योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणांच्या प्रात्यक्षिकांसह सराव करून घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी आभार मानले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments