Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या...

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

[ad_1]

Ambadas Danve allegations about Sambhaji nagar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील इंदिरा नगर परिसरात काही नागरीकांकडून मतदान कार्ड घेऊन त्यांच्या बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केली असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments