Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ३५ फेसबूक, १४ इन्स्टाग्राम, ४२ ट्विटर अकाऊंट...

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ३५ फेसबूक, १४ इन्स्टाग्राम, ४२ ट्विटर अकाऊंट ब्लॉक

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ३५ फेसबूक, १४ इन्स्टाग्राम, ४२ ट्विटर अकाऊंट ब्लॉक

[ad_1]

‘चलो दिल्ली’चा नारा देत पंजाबचे हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पंजाब-हरियाणाच्या सीमेवर हरियाणा पोलिसांनी अडथळे निर्माण करून या शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकौंट्स केंद्र सरकारने ब्लॉक केले आहे. यात ३५ फेसबुक लिंक, अकाऊंट, १४ इन्स्टाग्राम अकाऊंट, ४२ ट्विटर अकाऊंट, आणि १ स्नॅपचॅट अकाउंट व १ रेडिट अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. भारतात या अकौंटवरचा मजकूर किंवा व्हिडिओ दिसणार नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक केले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणीबाणीचे आदेश जारी करत हे अकौंट्स ब्लॉक करण्यात सांगण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments